पुन्हा पुन्हा मी आजमावले नशीब माझे
कधीच नाही कसे बदलले नशीब माझे?...
मी दु:खांना सामोरे गेल्यावर कळले;
या दु:खांनी होते भरले नशीब माझे...
अजूनही मी का आशेने स्वप्ने बघतो?
नेहमीच तर असते ठरले नशीब माझे...
शब्दांनी मी कबूल काही नव्हते केले;
नजरेमधुनी तुला समजले, नशीब माझे!...
'अजब' ठरवले मी जे त्याच्या उलटे घडले
मला कधीही नाही फळले नशीब माझे...
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा