स्वप्नांच्या दुनियेत ...

अजब - ⏱ १ मिनिट

स्वप्नांच्या दुनियेत सहज मी वावरतो
आणि खर्‍या दुनियेत यायला घाबरतो...

अपयश येते तेव्हा होतो आनंदी!
नित्य यशांचे मार्गच का मी ठोकरतो?...

कधीचाच मी गमावला माझा चेहरा
रोज मुखवटे नवे-नवे मी वापरतो...

आठवणी येतात नव्याने पुन्हा पुन्हा
अजून का मी तीच लक्तरे पांघरतो?...

शांतता मला असह्य होते कशी 'अजब'?
वादळा, तुझ्या येण्याने मी सावरतो...

गझल