फुलांना दंश काट्यांचे हवे होते
गुलाबी भावनांना हे हवे होते.....१.
जराशी पालवी फुटली असावी तो
कुणाला रोपटे सारे हवे होते !.....२.
कधी बुलबुल रडावी, नी कधी माळी !
फुलानां काय हे सारे नवे होते ?.....३.
जराशी आग दोघांच्या मनीं झाली
जगाला हेच तर सारे हवे होते.....४.
फुलांचा जीव जातो ह्या सुगंधाने !
जगाला अत्तराचे का नवे होते ? .....५.
नका जाऊ ` ख़लिश ' त्यांच्या असे दारी
अरे हे नेमके त्यानां हवे होते !.....६.
` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे/२८-०८-२००९
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा