तू जीवनात नाही आता कळून गेले.
वरदान आसवांचे मजला मिळून गेले.
दिसती नभात काही घन कृष्ण पावसाचे,
हे नेत्र वर्षले अन् ते घन निघून गेले!
शोधीत तेच धागे फिरतो अजून मीही...
ते बंध रेशमांचे सारे तुटून गेले.
आता किती मी आणि उजळू तुझ्या स्मृतींना...
साठ्यांत शून्य आता आठव उरून गेले.
बाहेर काढल्या मी त्या तुझ्या भेटवस्तू,
जे हरविले ह्रदय माझे, सापडून गेले!
झोप अशी आली त्या शीत उष:काली,
नयनांतिल दवबिंदू ओसरून गेले!
बाकी पुढ्यात आता अज्ञात पायवाटा
ते विश्व तुझे-माझे मागे सरून गेले.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा