वामवेद

विसुनाना - ⏱ १ मिनिट


जो ध्रुव तो ढकलला मांडीवरून जातो
प्रत्येक मार्ग माझा वेदीवरून जातो


लपवून ठेवतो मी ते बोल अंतरीचे
(तांडा किती कवींचा वेशीवरून जातो)


शिंपीत राहतो मी निर्माल्य वाळलेले
तो ढीग पाकळ्यांच्या ओलीवरून जातो


नाहीच छापलेला पोथीत पंडितांच्या
'मम-वामवेद' त्यांच्या डोईवरून जातो


वाघावरून येती मज भेटण्यास त्यांना
आलिंगण्यास मीही भिंतीवरून जातो


मारून त्याच बाता येईल की सफाई
(अस्वस्थ हात अजुनी टोपीवरून जातो)


गझल