गझल-" म्हणून जगणे आले"-

विदेश - ⏱ १ मिनिट

"म्हणून जगणे आले"-

जन्माला जगती आलो, म्हणून जगणे आले
मरणे ना अपुल्या हाती, म्हणून जगणे आले!

फुलले गुलाब भवती - काटेच टोचती मजला
वेदना खोलवर तरिही, जगण्याला जपणे आले!

घायाळ पहाण्या मजला - हे सगेसोयरे टपले
जखमी ना दिसण्यासाठी - मुखवटयात हसणे आले!

ठेवण्या सुखात तयाना मी वाल्या कोळी झालो,
ते वाटेकरी सुखाचे - प्रारब्ध भोगणे आले!

मम जीवन दुस-यासाठी, की स्वतःस जगण्यासाठी?
मजला ना सुटले कोडे - म्हणून जगणे आले !!

गझल