अंगार

काव्यरसिक - ⏱ १ मिनिट

सोसायचे किती? अंत नाही..आकार नाही,
चालायचे किती? आयुष्यही फार नाही...

माझ्याच रेशमाचे फास माझ्या गळ्याशी,
सापळ्यांमधून कोणी वाचणार नाही...

उगाच रानटी किड्यांनो पालवी खाऊ नका,
अडवून हा वसंत थांबणार नाही...

थोपवू कशा विषारी जिव्हांच्या कट्यारी,
माझिया सत्यास कोणी आज आधार नाही...

उघडून कितेक भोळी आसवेडी लोचने,
स्वप्नेच वाटतो मी हा व्यापार नाही...

विझवू पहाती मजला कंदील रापलेले,
क्षणैक पेटतो जो मी अंगार नाही......
-----------------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे

गझल