----पुन्हा का----

नेहा - ⏱ १ मिनिट

फुका का हसावे उगा का हसावे
असे हे हसू पुन्हा का हसावे ..

जमिनीत रोवून आभाळात जावे
पाण्यात न्हावुन पुन्हा का रुसावे

चिखलात कमळ फुलवित आहे
आपलीच भ्रांत पुन्हा का पुसावे

कोकिळिचा आवाज दूर गात जावे
कावळ्याला त्या पुन्हा का कुसावे

चोरीच्या जाळ्यात चोरानेच जावे
आपुलेच ठसे पुन्हा का ठसावे

संत्रिच्या बागात लिंबाने यावे
आंबट स्वाद पुन्हा का फसावे

प्रेमाच्या साक्षीने आनंदित व्हावे
असा हा आनंद पुन्हा का नसावे

----नेहा पांडुरंग परी ----

गझल