रात्र पुन्हा परीकथा रंगवेल

प्रसाद लिमये - ⏱ १ मिनिट

रात्र पुन्हा परीकथा रंगवेल
मिटणाऱ्या डोळ्यांवर पांघरेल

तीच वेळ, तीच वाट.. कालचीच
सवयीने नजर जरा घुटमळेल

नजरेचा स्पर्श जरा नजरेला
लाजाळू पापणी अता मिटेल

आसपास अता सर्व सामसूम
स्वप्नांनो अता सर्व आलबेल

भेट तशी संपली, न बोलताच
पण कळली श्वासांची घालमेल

तुटताना दूर तिथे ताराही
मनामधे काय बोलला असेल ?

गझल