|| मुखवटा ||
.
वृत्त : आनंदकंद ( गागालगा लगागा गागालगा लगागा )
|| मुखवटा ||
---------------
ग्रीष्मात थाटलेला, खोटा वसंत आहे
हा साज चेहर्याचा, कावा निरंत आहे
मी पाप काय केले, नक्कीच जाण त्याची
आतून मी हरामी, बाहेर संत आहे
हे काम क्रोध माझे, आहेत मित्र पक्के
मोहात रंगतांना , कोठे उसंत आहे ?
अंतस्थ वासनांचा, थैमान खेळ चाले
चारित्र्य स्वछतेचा, दावा अनंत आहे
गंगेत डुंबल्याने, पुण्यांत वाढ होते
देवास भोंदतांना, खासा जिवंत आहे !
अस्वस्थ वेदानांना , "मुक्ती" नशीब नाही
पापात जन्म जाता, शापात अंत आहे.
नाही समेवरी मी, आयुष्य संपताना
मात्रा चुकून गेल्या, याचीच खंत आहे..
--- आकाश बिरारी
.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा