रचतो गझला, मी फक्त, बसल्या बसल्या
होतो अपुला, मी मुक्त, बसल्या बसल्या
हसणे, रुसणे, ते घोळ करणे, नटणे
सहजी मिळतो, आसक्त, बसल्या बसल्या
बसलो आहे, मी गप्प बसलो आहे
उसळी मारे, हे रक्त बसल्या बसल्या
कुठली का ती, मैफील असुदे, तेथे
ठरलो अगदी, संयुक्त, बसल्या बसल्या
पुजतो अपुली, मूर्तीच 'बेफिकीर' मी
बनतो अपुला, मी भक्त बसल्या बसल्या
१. सूट - मतल्यात व 'संयुक्त' या शेरांमधे अलामत!
२. लय - प्रत्येक ओळीत, मतल्यातील 'बसल्या बसल्या' च्या ईक्विव्हॅलन्ट शब्दसमूह यतीनंतर उच्चारावेत. (खास जळगावकरांसाठी)
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा