..... नको रे
थुकल्याले चाटू नको रे
झुकल्याले मारू नको रे
वदल्याले खोडू नको रे
फुलल्याले तोडू नको रे
सुकल्याले वठवू नको रे
निजल्याले उठवू नको रे
फसल्याले रडवू नको रे
विझल्याले जळ्वू नको रे
पुजल्याले तोलू नको रे
नशिबाले बोलू नको रे
पळत्याले शोधू नको रे
सुटल्याले बांधू नको रे
शिकल्याले चिडवू नको रे
लिवल्याले मिटवू नको रे
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा