नको असे पण अजून त्यांना लगाव होता
कुणाकुणावर अजूनही तो प्रभाव होता
मिळेल कीर्ति उगाच मोठी पिटून टाळ्या
कुणाकुणाच्या मनात हाही तणाव होता
कसे विसरलो तिथेच आम्ही विचार अमुचे
चुकून झाले; तसा न कुठला ठराव होता
कितीक खुर्च्या भरून होत्या पुराणिकांच्या
तरी मिळाली न त्यास ज्याचा दबाव होता
उगाच डोळे करून मोठे बघू नका हो...
घरातले बोलले, न कुठला उठाव होता
असेच समजा तुम्हांस हाती न लागलेला
कधी अजयने असाच केला सराव होता
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा