माझा पहीला प्रयत्न.........आपल्या सूचनांचा अभिलाषी...
चेहर्याची चांगली ही रीत नाही
अंतरीचे दु:ख तो लपवीत नाही
जाहला तो भंग का त्या मैफिलीचा?
हर कुणी होउ शकत जगजीत नाही
वाघ ज्या प्राण्यास मी संबोधिलेले
जाहले ठाऊक तो ही धीट नाही
का असा दु:स्वास माझा तू करीतो
तो सुद्धा अन मी सुद्धा गुर्मीत ( गरमीत ) नाही
आहेस का कैलास चिंतातुर तू?
का तुझा मक्ता सदोदित नीट नाही
---डॉ.कैलास गायकवाड
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा