जीवन कसे जगावे,सगळ्यांस पेच आहे
मागील ठरे शहाणा,पुढच्यास ठेच आहे.
साहत कशा रहाव्या,जखमा जुन्या पुराण्या
दिसते जरी पुराणे,दुखणे नवेच आहे
पूजन कुणां करावे?पुजण्यास कोण आहे ?
सैतान भासतो जे,ते दैवत हेच आहे
वार्धक्य टाळण्याचे,माहित कुणास आहे ?
मरणे अटळ तरीही,जगणे हवेच आहे
दुखः पुरुन उरावे,''कैल्या ''स ज्ञात आहे
सारुन हर समस्या,निघणे पुढेच आहे.
डॉ.कैलास गायकवाड
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा