आता

अनिल रत्नाकर - ⏱ १ मिनिट

तारण्याला पाहिजे तो राम आता
आड डोळ्यांच्या निजे तो काम आता

ऊघड्याने बागडे ती लाज आता
लाजताना दाविजे तो काम आता?

वास घामाचा नसे पैशास आता
साठल्याने ना कुजे तो दाम आता

या मदांधाचेच खोटे राज्य आता
रोज पापाने भिजे तो साम आता

देह झाला राक्षसांचे धाम आता
ह्या भयानेची थिजे तो शाम आता

गझल