हात माझे फुलांनी ही पोळले होते.....

खलिश - ⏱ १ मिनिट

हात माझे फुलांनी ही पोळले होते
पावसाचे फुवारे ही बोचले होते.....

रेशमी बंधने ही फासा परी झाली
केवड्याला भुजंगानी वेढले होते....

रोज़ मी वाट त्याची पाहू किती आता ?
मी च स्वप्ना मधे त्याला चोरले होते.....

दुखः का एवढे भारी वाटते आता ?
केशराच्या परागानी तोलले होते.....

घेत आहे मद्यपींची काळजी आता
कंठ ज्यांचे दुधाने ही पोळले होते.....

` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / १०-०३-२०१०.

गझल