उत्तर

अमोल शिरसाट - ⏱ १ मिनिट

पुरे तुझा हा रडवेला स्वर;
चल जगण्याशी दोन हात कर!

तुझे नि माझे जमणे नाही....
जा बाई तू मला माफ कर...!

दुर्गंधी लपणार कोठवर?
जरी लावले उंची अत्तर !

मीही मित्रा ध्यास घेतला....
कितीक करशील माझा वापर?

रानफुले शिकतात उन्हातच...
कुठली शाळा? कुठले दप्तर?

आता असतील प्रश्नही माझे
हवे तसे मी देईन उत्तर...!

अमोल शिरसाट,
अकोला.
९०४९०११२३४
.

गझल