असा कसा मोहरुन गेलो,तुला पहाता हरून गेलो
कधी न होतो जरी कुणाचा,तुझाच आता ठरून गेलो
न काहि येता कसे जगावे,इथेच सारे कळून गेले
जरी न पोहावयास येते,हरेक सागर तरून गेलो
नि:शब्द झालो सदैव तेव्हा,जशीजशी तू समोर आली
तुझेच गाणे म्हणावयाला,पुढे घसा खाकरून गेलो
समस्त दु:खे समग्र नाती,गरीब होतो धरून होतो
जसे मला धन मिळू लागले,जुने दिवस विस्मरून गेलो
न लाच घ्यावी कधी कुणीही,विचार माझा असाच होता
दिले जसे अर्थपूर्ण खाते,कित्येक टेबल चरून गेलो
जिवंत होतो कधी न तेव्हा,महत्व मी स्वच्छतेस दिधले
मरुन '' कैलास '' जीवनाचे,गटार हे आवरून गेलो
डॉ.कैलास गायकवाड
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा