रात्र सारी जागू नको
झोप माझी मागू नको
जाहलो मी वेडापिसा
लाघवी तू वागू नको
शब्द माझे झोपेतले
स्वप्न माझे मागू नको
चूक आहे साधीच ती
तोफ मोठी डागू नको
वेळ नाही माझ्याकडे
फार मागे लागू नको
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा