श्वास

प्रसाद लिमये - ⏱ १ मिनिट

कोणते श्वास श्वासांसवे जागले ?
जाग आली तुझे भास रेंगाळले

भेटण्याला नसावीतही कारणे
पण सुचावेत काही बहाणे भले

ही मिठी ओळखे शब्द अस्पष्टसे
ओळखावे कसे श्वास आपापले ?

साथ अदृश्य निःशब्द होती तुझी
फार नव्हते तसे एकटे वाटले

आजही जाणतो मंद चाहुल तुझी
दार नाही मनाचे अजुन गंजले

गझल