राखते तोल मी.....!!!
जे पाहते - जाणते ते बोलते बोल मी,
गुंत्यात का भावनेच्या गुंतते खोल मी ?
कोणी - कसेही - कुठेही बोलते - वागते,
माझ्याच ना आसवांचे जाणते मोल मी !
तालावरी ढोलकीच्या नाचली पैंजणे ,
वॄंदावनी मंजि-यात्या वाटते फ़ोल मी !
गंधाळुनी रात हिंदोळी सुखाच्या झुले ,
मीठीतही साजणाच्या राखते तोल मी !
साराच हा खेळ मिथ्थ्या , येर-झा-या ठरे
पृथ्वीपरी भोवताली का फ़िरे गोल मी ?
-सुप्रिया (जोशी) जाधव.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा