अस्ता॑चली रवी मी विझता॑ना पहात होतो ।
पाऊल खुणा माझ्या मिटता॑ना पहात होतो ॥१॥
तो गाज सागराचा ऐटी ऽ त लाट होती ।
लाटेस किनार्यासी विरता॑ना पहात होतो ॥२॥
मोहात मी कितिकदा फसलो नि बुडलो होतो ।
लाटा॑त किनार्याला बुडता॑ना पहात होतो ॥३॥
या अथा॑ग सागराचा तो अल्पसा किनारा ।
मिलनाचे निकष सारे तुटता॑ना पहात होतो ॥४॥
अमर्याद साठे कोठे इतरा॑ना थे॑ब ही ना ।
व्याकुळ जीव जना॑चे जगता॑ना पहात होतो ॥५॥
होडीत सागराची आणून नित्य दौलत ।
कोणा॑स सागराला लुटता॑ना पहात होतो ॥६॥
जलदा॑परी मी व्हावे जीवन जना॑स द्यावे ।
मी ढगा॑स सागराला लुटता॑ना पहात होतो ॥७॥
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा