बोललो होतो जरी.... विसरून पाहू
भेटलो... इतके तरी अठवून पाहू
ठेवली आहेत जी अस्पर्श स्वप्ने
ती घडी केव्हातरी मोडून पाहू
मीच लिहिलेला ‘खरा’ इतिहास आहे
कोणत्या रंगामधे बुडवून पाहू ?
मोगरा, चाफा, जुई, गाणी कळ्यांची
वेगळे काहीतरी याहून पाहू
वास्तवाला हात लावूही नको... चल,
रेघ स्वप्नाची जरा आखून पाहू
बोलताना संपला रस्ता अचानक
कोणत्या स्वप्नासवे परतून पाहू ?
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा