सांग कोठे माणसा आहेस तू ?
चित्तरंजन भट कसा आहेस तू ?
तू हिरा जर पाडले पैलू तुला
जाळले तर कोळसा आहेस तू !
काय दिसते तेच दाखवतोस ना ?
एक साधा आरसा आहेस तू !
हा तुझ्यामाझ्यात इतका भेद का ?
मी जसा अगदी तसा आहेस तू
बोल ना काहीतरी चिमटाच घे
दे जरासा भरवसा आहेस तू !
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा