लोक..
का आता हे आले लोक..?
आले- गेले, - साले लोक...
ह्या वाटेने गेले कोण..?
..सैरावैरा झाले लोक..!
प्रत्येकाला आली धार..
..झाले बरची, भाले लोक
ज्या लोकांनी केला घात,
माझे त्यांत निघाले लोक
ज्याचा त्याचा एकच ध्यास..
..पैसा..धंदेवाले लोक
घेवुनिया तेजाचे ढोंग
अंधारात बुडाले लोक
..सॄष्टी की डोळ्यांचा पूर..?
अन अश्रूंनी न्हाले लोक...
-प्रा.डॉ.संतोष कुलकर्णी, उदगीर
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा