चेहर्याला झाकते ती
आत थोडे हासते ती
माळतांना हार कोरा
मोगऱ्याशी भाळते ती
संकटांशी झुंजतांना
चूक साधी टाळ्ते ती
गारव्याची साद येता
तेज थोडे पाळते ती
हारलेला डाव माझा
जिंकतांना हारते ती
--------------------बापू दासरी, नांदेड
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा