अभिप्रेत : अमोल शिरसाट

अमोल शिरसाट - ⏱ १ मिनिट

याद माझी येत नाही हे ख्ररे का?
त्रास थोडा देत नाही हे खरे का ?


तू निघावे अन् तुला मी  थांबवावे 
हे तुला अभिप्रेत नाही हे खरे का ?


जाळते आहे जिवाला खूप जी,...ती
वेदना गझलेत नाही हे खरे का ?


खूप आहे आज पैसा ...पण मनाला
तो दिलासा देत नाही हे खरे का ?


हाय! जे पावित्र्य होते काल तेथे.... 
आज ते गंगेत नाही हे खरे का ?
 


अमोल शिरसाट, संवेदना रायटर्स कम्बाईन, मिलिंद विद्यालय,कमला नगर,
वाशिम रोड ,बायपास अकोला. भ्रमणध्वनी क्रं ९९२२६४६००२
(भेटा: http://amolshirsat.blogspot.com/ http://wamandadakardak.blogspot.com/)

गझल