ते तसे नव्हतेच ,पण मी ते तपासुन पाहिले,
मी तुझ्यामाझ्यातले नाते तपासुन पाहिले...
रात्र अर्धी लोटली की , सोडुनी मज एकला,
नेमके, मन कुठवरी जाते ? तपासुन पाहिले...
त्या तिच्या नजरेत होते जीवनाचे गीत, ते
ती मुकी मुलगी कशी गाते ? तपासुन पाहिले...
जाणिले, जे भोगले , का भोगले ? माझेच मी
काल गतजन्मातले खाते तपासुन पाहिले...
रोज ती हप्त्यात मेली , पण तरी जगली कशी ?
कोणते हे जहर ती खाते ? तपासुन पाहिले...
...शैलेश कुलकर्णी
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा