...गझल...
दाद मिळाली ज्या भावात ,
विकत घेतली हातोहात !
चुका सातशे करण्याला ,
जन्माचे आवर्तन सात !
छोटे वय मोठ्यास म्हणे,
"हात ! हारे ! हातरे ! हात !"
पणतीच्या व्यासंगाला
वातीच्या देहाचा घात !
भिंतीला जाणीव हवी
वार्याचा पुरतो आघात!
तुझे नियंत्रण मरणावर ,
जगणे तर माझ्या हातात !
...शॅलेश कुलकर्णी
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा