-गझल-
माणसे नसतात जेव्हा , भावना असतात का रे ?
सावल्या घनदाट अंधारातही दिसतात का रे ?
करपल्या शेतात विहीरी कोरड्या पडल्या तरिही,
संयमाने ते जमीनी आमुच्या कसतात का रे ?
जीवघेणे दु:ख काही जाहले दिसते तयांना ,
आज वेड्यासारखे ,ते सारखे हसतात का रे ?
तोच मासेमार आणि ओळखीचे तेच जाळे ,
जाणता परिणाम, मासे नेमके फसतात का रे ?
पाठ जुळलेल्या जुळ्यांच्यासारखे जन्मास येता ,
सॉख्य आणि दु:ख इतके वेगळे दिसतात का रे ?
-शॅलेश.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा