..........................
घृणा... !
..........................
कुणीतरी येईल...कधीतरी येईल !
खुळ्याच मी आशेत...खुशी घरी येईल !
घृणा... !
..........................
कुणीतरी येईल...कधीतरी येईल !
खुळ्याच मी आशेत...खुशी घरी येईल !
बरोबरी केलीस...बरेच हे केलेस...!
तुझी किती येऊन सरासरी येईल ??
उगाच मी स्वप्नात रमे कधीपासून...
उदास आयुष्यास कळा बरी येईल !
निघून सारी लाज हसायचे लाचार...
घडी अशी निर्लज्ज, निलाजरी येईल !
नवे नवे सारेच...अनोळखी गावात...
जुने कुणी भेटेल...मजा खरी येईल !!
नसेल अस्तित्वात जगात जी कोठेच...
म्हणे, तुझी होण्यास अशी परी येईल !!
पल्याडचा आनंद अल्याड मी आणीन...
जरी नव्या घाटात नवी दरी येईल !
उभे मला केले न कधीच तू दारात...
कधीतरी ही वेळ तुझ्यावरी येईल!!
कठोर मी होईन...मला सजा देईन...
घृणा मला माझीच जरा जरी येईल !
- प्रदीप कुलकर्णी
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा