भाषणबाजीने नटलेला देशभक्तीचा आव होता
बोलुन गेले अनेक आणखी खाजविण्याला वाव होता
विषय फालतू बोलत होते, मोठेपण ते सांगत होते..
समजत नव्हते मागे-पुढे आणखी कोणता डाव होता?
रक्त सांडले या भूमीवर वीरांना त्या वंदन करण्या..
जमला मेळा बाजारी आणि सांगत अपुला भाव होता
अपुला अपुला झेंडा रोवुन रक्त कोणते गेले सांडुन?
स्वार्थाचे हत्यार पाजळुन क्रांतिवीरांवर घाव होता
कुणासच नव्हते भान दिसाचे कशासाठी जमले सारे..
आणि मौज मजेला कंटाळुन गेला सारा गाव होता
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा