साधवी...

निरज कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

साधवी... ( गझल )

शब्द माझे मानसी होणार केव्हा?
काव्य माझे कौमुदी घडणार केव्हा?

का असा लांबून माझा ध्यास घेते?
बाहुपाशी तू सखे जडणार केव्हा?

का जगाला टाळतो नाना प्रकारे?
मी स्वयंभू पूर्णतः बनणार केव्हा?

मी तुझ्यासाठीच माझे शब्द वेचू;
तू अशी जादूगरी करणार केव्हा?

मोह-मायेच्यामधे, पुरता बुडालो;
सांग देवा, मी पुन्हा तरणार केव्हा?

धगधगे वैफल्य ज्वाला, या उराशी,
मोक्ष मज आता तरी, मिळणार केव्हा?

मी गझलची, साधना, करतो अताशा;
साधवी माझी गझल, ठरणार केव्हा?

- निरज कुलकर्णी.

वृत्त - मंजुघोषा
गण - गालगागा गालगागा गालगागा
मात्रा - २१

गझल