मी खरे बोललो तेव्हा कुणास पटले नव्हते
मी बरे बोलल्यानेही भांडण मिटले नव्हते...
मी तुला म्हणाले होतो, "ऐकू नकोस माझे"
आता नकोस सांगू की मी हे म्हटले नव्हते...
बेसावध मी होतो, माझ्यावर हल्ला झाला
जे हृदयाला भिडले ते तीर 'निसटले' नव्हते...
जगता जगता माणुस कर्जात बुडूनच जातो!
माझे गतजन्माचेही कर्जच फिटले नव्हते...
आशेस उराशी माझ्या इतके जपले मी, पण
या नशिबाने माझे फासेच पलटले नव्हते...
तो 'अजब' पुरावा होता दोघांच्या प्रेमाचा
बोलण्यात दोघांच्या ते कधी उमटले नव्हते...
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा