सोळा...

केदार पाटणकर - ⏱ १ मिनिट

घेतला तर छान धांडोळा
...अन्यथा सगळाच पाचोळा

सारखे उडते हवेने जे -
तू किती करशील ते गोळा ?

मी खरे तर बेरकी आहे
चेह-याने वाटतो भोळा


काम य़ेथे चांगले झाले
-फिरव आता त्यावरी बोळा

काळजी घे, जप स्वतःला तू
पूर्ण झाले वय तुला सोळा



... सर्व गझलकारांना दस-याच्या शुभेच्छा !

गझल