आरसा

अजय अनंत जोशी - ⏱ १ मिनिट

पाण्यातल्या रंगासम असा,
लागे कशाला मग आरसा ?


या जीवनाची ही पद्धती..
कासव पळे अन् झोपे ससा


सांभाळले मी दु:खा असे...
उचलून घेतो बालक जसा


अर्जून राही मागे उभा..
चाले शिखंडीचा वारसा


कंसात कोणी आले जसे...
बनलोच मीही कान्हा तसा


करतो अताशा मीही चुका
नित जिंकतो दुर्गम साहसा


फुकटात दु:खे मिळती जगां..
कापून गेले सा-या नसा

गझल