शब्दवीर...

निरज कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

शब्दवीर... (गझल)

संवाद साधण्याला, थोडा उशीर झाला...
अन् धुंद श्वास माझा, आता फकीर झाला...

वाळूत रेखिले मी, सौंदर्य 'अमृता'चे...
सामावण्यास तिजला, सागर अधीर झाला...
( ज्या मुलीसाठी मी काव्य रचतो तिचे नाव 'अमृता' आहे. )


स्वर्गीय देवतांनी, अमुच्यात फूट केली...
हा कालिदास 'काफर', मुस्लीम 'मीर' झाला!

पाठीत घाव करणे, मोठी 'कला'च आहे!
तो कालचा शिपाई, झटकन 'वजीर' झाला!!!

गझलेतल्या नशेने, जो चिंबलाच नाही...
कोणी कुठे असाही, का 'शब्दवीर' झाला???

- निरज कुलकर्णी.

गझल