दिवाळी अंक २००८
१ गझल : योगेश वैद्य
गझल

फोडुनी पाझर काळ्या खडकापार गझल
प्रत्ययी दाखवते डोहे निळेशार गझल
पारदर्शी पुतळीच्या नयनी भाव गहन-
चित्तचोरी करते सुंदर सकवार गझल
शुद्ध अन् कोमल सारे स्वर जोखून तरळ
आज केदार उद्या गाईन मल्हार गझल
वाट चोखाळत जाईन प्रकाशी अविरत
आडमार्गी न कधी ठोकर खाणार गझल
आजचे हार-तुरे-कौतुक टाळून सहज-
शिंपते बाग
दिवाळी विशेषांक २००८
विशेषांकाबद्दल चार शब्द...
गझलरसिकहो,
नमस्कार
मराठी गझलेला वाहिलेला हा दिवाळी अंक वाचकांच्या हाती देताना अतिशय आनंद होत आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे अंक वेळेवर - म्हणजे ऐन दिवाळीत - प्रकाशित करता येऊ शकला नाही, त्याबद्दल खेदही होत आहे. वाचकांची त्यामुळे गैरसोय झाल्याने मनापासून क्षमा.
मराठी गझलेसमोरची वाट आज खूपच विस्तृत झालेली
भटसाहेब ३
मला आठवतंय, भटसाहेब त्या काळात `मेनका` या मासिकात गझलिस्तान हे नवगझलकारांच्या गझलांचे सदर मोठ्या हिरीरीने चालवीत असत. ती त्यांची एक गझलविषयक लढाईच होती म्हणा ना ! मराठी गझल हे भटसाहेबांचे जीवितध्येय होते. त्यांच्या डोक्यात, मनात गझलेशिवाय दुसरा विचारच बहुधा नसे. अस्सल, खरीखुरी मराठी गझल मराठी मातीत रुजावी, यासाठी त्यांनी हाती
परिपूर्ण

किती रुंजी अशी तिथल्या तिथे घालत रहावे
नवी क्षितिजे नवे आकाश धुंडाळत रहावे
कुणासाठी भविष्याची खुली आहेत दारे
किती भूतकाळाशीच रेंगाळत रहावे
कधी हे मौन पडते आपलया पथ्यावरी पण
शहाण्याने मनाशी वाद हा घालत रहावे
तुझ्या डोळयातले गाणे तुझ्या मौनातली धुन
तुला ऐकत रहावे की तुला पाहत रहावे
तुझ्या गाण्यात
पुन्हा पुन्हा

वेचुनी फुलांस ते माळणे पुन्हा पुन्हा
रोज हेच व्हायचे पाहता क्षणी तिला
बोलणे कसेबसे हासणे पुन्हा पुन्हा
रोखली किती जरी याद रोज यायची
अन असेच रोज मी जागणे पुन्हा पुन्हा
या जगात सारखा त्रास सोसला किती?
आसवे अशीच मग ढाळणे पुन्हा पुन्हा
खेळते जिथे
सुरुवात

एवढे रंगू नये स्वप्नात कोणी
फारसे गुंतू नये कोणात कोणी
काय होता आपला संबंध आधी ?
निर्मिले नाते तुझ्यामाझ्यात कोणी ?
हेलकावे रोज या प्राणास बसती
सांग, भरली वादळे श्वासात कोणी ?
दिवस हे कोणामुळे बहरून गेले ?
आणि स्वप्नांनी सजवली रात कोणी ?
खेळ प्रीतीचा सुरू झाला मनोहर
सांग, केली नेमकी सुरुवात कोणी ?
-- केदार पाटणकर
काही वेळा...

खूप उशीरा चूक समजते, काही वेळा...
बघता-बघता गढूळ होते पाणी इथले;
सावकाश मग तेच निवळते, काही वेळा...
चांदण्यात मी रात्र जागतो नेहमीच, पण
चंद्राविण मग रात न ढळते, काही वेळा...
फूल कधी प्रत्येक कळीचे होते का हो?
एखादी पण आतुर असते, काही वेळा...
जीवन
घडामोडी
बेफाम या वर्षातही घडल्या घडामोडी
लोकांसवे, देशासही नडल्या घडामोडी
लाटा सुनामीच्या,..कुठे भूकंप वा काही
थैमान मृत्यूचे तशा घडल्या घडामोडी
झाली पुन्हा दंगल .. नवा आयोग अन अहवाल...
सरकारदरबारी पुन्हा सडल्या घडामोडी...
लिहिला कुणी सोयींतला इतिहास देशाचा...!
सत्यातल्या कित्येकही दडल्या घडामोडी
झाला असा मृत्यू कुण्या साध्या मनुष्याचा..
बेवारशी वाटे जणू पडल्या
माझा पत्ता असणारा हा गावच नाही

माझा पत्ता असणारा हा गावच नाही
माझ्या इथल्या पत्त्यावरती नावच नाही
मृत्यू कोठेही यावा... पण वीरावाणी..
भित्र्यावाणी जगण्याची मज हावच नाही
एकेकाच्या आघाताने कळवळतो मी...
प्रत्येकाला वाटे ...'हा तर घावच नाही...!'
ज्या शब्दांच्या लाटा देती मजला धडका..
..खडकांच्या लेखी तर त्यांना भावच नाही..!
ज्याला त्याला वाटे त्याचे मी ऐकावे