आयुष्य तेच आहे - या मक्त्यावर आधारित

अलखनिरंजन - ⏱ १ मिनिट

"आयुष्य तेच आहे
अन हाच पेच आहे"
(या मूळ मक्त्यावर आधारित)

का शोधिसी पुन्हा तू
जे आपुलेच आहे

समजावतो मनाला
अजुनी खुळेच आहे

बिनधास्त आग लावा!
जगणे मढेच आहे...

का मागचा रडे हा?
पुढच्यास ठेच आहे

अश्रूच फक्त ताजा,
रडणे शिळेच आहे

ती भेटणार नाही
तेही बरेच आहे...