डाव फिरुनी मांडला तो ही चुकीचा
एक फासा टाकला तो ही चुकीचा...टाकले पाऊल ते होते चुकीचे
मार्ग जो मी शोधला तो ही चुकीचा...हे करू की ते करू ह्या संभ्रमी मी
का दिला सल्ला मला? तो ही चुकीचा?मौन मुद्दामून होते पाळले मी
अर्थ त्यांनी काढला तो ही चुकीचाव्हायचे होतेच ते होऊन गेले
ज्योतिषी कसला भला? - तो ही चुकीचाजीवनाला ताल नाही, मेळ नाही
सूर जो मी लावला तो ही चुकीचा
संगीता जोशी
ए१, भूषण अपार्टमेंट्स
११/२, कर्वेनगर
कमिन्स महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ
पुणे-४११ ०५२.
भ्रमणध्वनी- ९८९०४५६२०२
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा