** कवीमन चौकटी मानणार नाही **
कविता काही गझल रचणार नाही
भाव मी अंकात मोजणार नाही
शब्दांना बांधा तुम्ही नियमाने
संवेदना मी करकचणार नाही
नका दाखवू शब्द घाव तुम्ही
तुडवलेलं फुल मी लपवणार नाही
तोला रे तुम्ही शब्दांची खोली
तराजूत मी मन तोलणार नाही
रेखाटा तुम्ही शब्द आकॄत्या
भू हे आकाश चित्र गिळणार नाही
रोखा रे तुम्ही शब्द लाटांना
उरीचा झरा मी अडवणार नाही
कुपीत भरा तुम्ही शब्द केवडा
मन सुगंध मी कैद करणार नाही
लखलाभ तुम्हांलाच झापड तांडे
कवीमन चौकटी मानणार नाही
- स्वप्ना
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा