विचाराधीन

तांत्रिकदृष्ट्या निर्दोष नसलेल्या गझला इथे हलविण्यात येतील.

वस्ती..!

मी जी दुनिया पाहिली, ज्या दुनियेत राहिलो त्या 'वस्ती'त मला रौशनी नावाची एक घरवाली मावशी भेटली.. त्या वस्तीला, त्या रौशनीला या काही ओळी समर्पित..

वस्ती पाखरांची झळाललेली होती
मस्ती कामांधांची उफाळलेली होती!

मद्याचे प्याले नाचत होते
भूक विश्वामित्राची चाळवलेली होती!

गेलो कराया सांत्वन पाखरांचे
गात्रे तयांची जळालेली होती!

दिले धडे

देखावे..

ओळखीचे होते सारे तिथे
देखावेच होते न्यारे तिथे!

गाईन गीत आता खुशीने
वाहतील मोकळे वारे तिथे!

लाभेल शांती तिच्या जिवाला
आनंदे वाहीन भारे तिथे!

फेसाळेल मद्य प्याल्यात आता
कोंडाळतील हावरे सारे तिथे!

मी आस्तिक, मी नास्तिक
उघडीने सारी दारे तिथे!

-- तात्या अभ्यंकर.

~ प्रेम माझे साफ झाले ~

प्रेम माझे साफ झाले
जे तुझे ते माफ झाले

काळजाच्या भावनांना
मारण्याचे पाप झाले

राहिले ते दूर आता
नाव ज्याचे जाप झाले

सोडिले मी भूत मागे
वेदनेचे साप झाले

प्रेम व्याधी सांगताना
कालचेते बाप झाले

गंजला खंजीर आता
ध्येय सारे साफ झाले

- रमेश ठोंबरे

मुलगी

मुलगी असे अपुली माय
दुधावरची आपुट साय

तळमळीने जपे घरास
परसातली व्याकुळ गाय

उमजे तिला दु:ख आधी
अपंगाचा होते पाय

उडे गोंधळ पडे प्रश्न
उकल शोधुन देते राय

जवळ नसते जेव्हा कधी
माझ्यापाशी उरते काय

पाय

असा कसा उठला बाजार श्रद्धेचा ज्ञानिया
रेड्याचा हा हाती कासरा, धरला विठू तू

रुजू शासकीय महापुजा दुष्काळ निवारणा
विकासाच्या नावे खिसा, भरला विठू तू

भेगाळली वीट पुंडलिकाची वाहून पापाला
इतुका सुवर्णाच्या भाराने वाकला विठू तू

नाम्याच्या समाधीचा चोरला जाताना चिरा
तुझ्या इमल्यावर चढवला इमला विठू तू

आषढी-कार्तिकी श्राद्ध तुकयाचे इंद्रायणी

मधाळ हाय-बायचे काय करावे...

*************************************
*************************************

आता पेच हाच की जगायचे काय करावे
चेहेर्‍यास हरघडी फसायचे काय करावे

बंदोबस्त चोख नव्हता असे वाटुन गेले
स्वप्नांचे तळेच आटवायचे काय करावे

सोयीने जगायचे तुझे सर्वमान्य बहाणे
संदर्भासही असे पुसायचे काय करावे

सारे थाटमाट वेगळेच असतात अशांच्या
रोजच्या मधाळ हाय-बायचे काय करावे

हाकारे जुनेच आजकाल असतात उराशी

माझाच व्हावा मला नित्य आधार

कोठे मिळावा प्रकाशात शेजार
कोठे उरावा मनाचाच अंधार

का जात नाही अता सूर्य अस्तांस ?
मोजून केला कुठे आज शृंगार...

राजा निघाला गुन्हे संपवायास...
त्याचे गुन्हे मोजण्या कोण येणार ?

माझे, मनाशी तुझ्या, मागणे हेच ..
माझाच व्हावा मला नित्य आधार

ती जायची रोज अर्ध्याच भेटीत
अन् त्यातही तीच घालायची

व्हायचे ते

व्हायचे ते जगी चुकले कधी का?
तारकांना कुणी पुसले कधी का?

आज आले जरी अवसान हाती
पार नेण्या तुला पुरले कधी का?

हाय जीवास मी कवटाळलेले
काळ दारी उभा कळला कधी का?

फूल हाताळले असता कवीने
गंधही कोवळा उरतो कधी का?

मी जशी लावली निरपेक्ष माया
तू तशी ना दिली

समर्थ

संहिता जुनी नवीन अर्थ मागते
अन्यथा विसर्जनास गर्त मागते

आज कोणत्या अटीत गुंतणार मी?
(भेट नेहमीच ती सशर्त मागते!)

कल्पनेस तेज, ओज, चेतना हवी,
ले़खणी सशक्त शब्द, अर्थ मागते

तोच घेउनी फिरे रिता कमंडलू,
काय त्या दयाघनास व्यर्थ मागते?

स्वत्व जागवील, राष्ट्र उद्धरील जो,
भूमि ही असा नवा समर्थ मागते

चमकण्याचे अचानक कारण येते...

चमकण्याचे अचानक कारण येते
तिथे नेमके चंद्रास ग्रहण येते

धान्य पिकविले तू आणि मी सारखे
फरक इतकाच की तुला दळण येते

खेळू नकोस मनाशी! लक्षात घे -
हे, कि तुझ्याइतकेच मलापण येते

बदलू नये कुणीच केंव्हा कुणाचे
असते नशीब तिथे देवपण येते

घडते असेच प्रेम..! का ? कोण जाणे