दूर तू आहेस अन् सुचते न गाणे
हे असे माझे जिणे लाजीरवाणेराहिली आजन्म ती येथे कुमारी
भेटला नाही तिला माझ्याप्रमाणेदान माझे पाहुनी हा कर्ण लाजे
मी फुटाण्यांना दिले साखरफुटाणेटाकतो विश्वास मी कोणावरीही
भेटणारा वाटतो माझ्याप्रमाणेगुंफले जेव्हा तिने हे नाव माझे
धन्य झाले पाठ केलेले उखाणेमी भटांचा कोण आहे काय सांगू!
गझल माझी सांगते माझे घराणे
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा