मी बोचलो म्हणाले
मी बोचलो म्हणाले त्यांना - किती ठिकाणी
हेही खरेच, माझी नाही मिठास वाणी
घडणार काय त्याचा आहे कुणास पत्ता?
आत्ता मनात आहे तर घे छळून राणी
होतो उशीर तेव्हा रचतो नवी कहाणी
इच्छा असेल तेव्हा भेटावयास ये तू
शोधू नको बहाणे, ठेवू नको निशाणी!
मी बोचलो म्हणाले त्यांना - किती ठिकाणी
हेही खरेच, माझी नाही मिठास वाणी
घडणार काय त्याचा आहे कुणास पत्ता?
आत्ता मनात आहे तर घे छळून राणी
अडवून त्यास धरले होते दगडविटांनी
शोधून वाट त्याची गेले निघून पाणी
होतो उशीर तेव्हा रचतो नवी कहाणी
इच्छा असेल तेव्हा भेटावयास ये तू
शोधू नको बहाणे, ठेवू नको निशाणी!
तारा तिच्या मनाच्या झंकारल्या कशाने?
असते खुषीत ती अन लिहिते सुरेल गाणी
- सोनाली जोशी
(सुरेश भट यांच्या 'कहाणी' या गझलेच्या जमिनीवर)
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा