नशा

जराशी जराशी नशा, ही चढावी
तुझी ऊब गात्रात, माझ्या असावी

जरा चोरुनी तू, मला न्याहळावे
जराशी तुझी, पापणी अन् लवावी

जरा लाजुनी तू 'नको रे' म्हणावे
मिठी लाजरी त्याचवेळी पडावी

तुझा श्वास, श्चासत माझ्या भिनावा
नशेला नव्याने, झळाळी चढावी

तुला मी, मला तू, असे नीववावे
पुन्हा एक ज्वाळा उफाळून यावी

-- सदानंद डबीर