आता नवे जगायाच्या उमेदी आणू कशाला?
आता नवे भोगायचे शाप मी मागु कशाला?
आता नवे सोसायची नाही तयारी मनाची,
आता नव्याने स्वतःला मी आजमावू कशाला?
तेव्हाच माझ्या भावनेला साद ना आली तुझी,
आता नव्या डोळ्यांत मी भाव ते वाचू कशाला?
जरी न झाला मनाप्रमाणे जीवनाचा सोहळा,
पुण्य माझे तोकडे अन् व्यर्थ मी भांडू कशाला?
जगू दे मला अजून थोडे क्षण सुखाचे मोजके,
मी आताच सांग शेवटाले मागणे मागू कशाला?
---------------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा