
मनाप्रमाणे माझ्या जगलो,खरे सांगतो
तसा कुणा नाही आवडलो,खरे सांगतो
किती दिसांनी शिरलो होतो घरात माझ्या
अनोळखी नजरा,घाबरलो,खरे सांगतो
बघून आलो मीही जेव्हा उजाड गावे
पुढ्यातल्या दु:खाला हसलो,खरे सांगतो
मेले होते कुणी वाटते उघड्यावरती
बघावयाला होतो जमलो,खरे सांगतो
निघून गेले पुढे सोबती खाऊन माझे
इथेच जागी मी साकळ्लो खरे सांगतो
--योगेश वैद्य
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा