
करा माणसे जोडण्याची तयारी
दुरावे पुन्हा तोडण्याची तयारी
यशाची असे भूक त्यांची निराळी
खरे बोलणे सोडण्याची तयारी...!
दिसे नाव यादीत पहिलेच माझे..;
तरी चालली खोडण्याची तयारी...!
कुणाच्या पुढे वाकण्याचा न बाणा
मनाची जरी मोडण्याची तयारी..!
गरीबीमुळे एक वरदान लाभे..,
पहाडासही फोडण्याची तयारी..
कशाची करी रोज घरदार घाई..?
जणू गावही सोडण्याची तयारी...!
सदा राखतो मी मनी दांभिकांना..
पुराव्यानिशी झोडण्याची तयारी...
-- संतोष कुलकर्णी
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा