(कौतुक शिरोडकरांच्या 'रोजचेच..' या गझलेवरून सुचलेले हे काही शेर. एवढ्या लहान वृत्तात लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे चूभूद्याघ्या.)
==========
गिरवतोय रोजचेच
नाद तेच, वाद तेच..
रोज 'आजचे भविष्य'
हाय! कालसारखेच..
भेटलो किती दिसात,
हासलो किती बळेच..
का विचारशी उगीच,
ही दशा तुझ्यामुळेच !
सत्य बोलतो खुशाल
संपलेत डावपेच.
काळजी करू नकोस;
'सोडली' तुझ्यासवेच..
गे, तुला कधी कळेल-
जिंकतात कासवेच..!!
वाद वाढवू उद्यास
तूर्त आज एवढेच !
-ज्ञानेश.
==========
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा